Thursday 15 April 2010

'इन्फ्लेशन' ९.९

गेल्या मार्च महिन्यात देशातील घाऊक किंमत निदेर्शांक (होलसेल प्राइस इंडेक्स अर्थात 'इन्फ्लेशन') आणखी किंचित वाढून ९.९ टक्क्यांवर पोहचला आहे. अन्नधान्यांच्या घाऊक भावांत होत असलेली वाढ आता हळूहळू इतर वस्तूंपर्यंतही ('नॉन फूड आयटम्स') विस्तारु लागली आहे. मात्र, मार्चमध्ये 'इन्फ्लेशन' दोन आकडी होईल हा अनेक जाणकारांचा अंदाज खोटा ठरला आहे. 'मॅन्युफॅक्चर्ड गुड्स'नाही भाववाढ घेरत असल्यामुळे भारतीय रिर्झव्ह बँक येत्या मंगळवारी (२० एप्रिल) जाहीर करणार असलेल्या वाषिर्क चलन व पतधोरण आढाव्यात भावनियंत्रणासाठी चलनपुरवठा कपातीचा उपाय योजण्याची शक्यता पुन्हा वर्तविली जात आहे.

केंदीय अर्थमंत्री प्रणव मुखजीर् यांनी येत्या जूनपर्यंत भाववाढीचा दबाव ('इन्फ्लेश्नरी प्रेशर्स') राहील आणि त्यानंतर, रब्बीचे (हिवाळी) पीक बाजारात आल्यानंतर तो क्रमश: कमी होत जाईल, असे म्हटले आहे. मार्च २००९ मध्ये 'होलसेल प्राइस बेस्ड इन्फ्लेशन' १.२० टक्के इतकेच होते.

अर्थतज्ज्ञांच्या मते मात्र 'होलसेल प्राइस इंडेक्स'मध्ये किचिंत वाढ जरी झालेली असली तरी रिर्झव्ह बँकेला चलनपुरवठा कपातीचा मार्ग अवलंबावाच लागणार आहे, कारण ९.९ टक्के आणि १० टक्के (दोन आकडी) यात फारसा फरक नाहीच. पंतप्रधानांच्या आथिर्क सल्लागार मंडळाचे एक सदस्य सुमन के. बेरी यांनी सांगितले की, रिर्झव्ह बँक 'मॉनेटरी पॉलसी'त 'टायटनिंग'चे उपाय योजण्याची अपेक्षा आहे.

(वृत्तसंस्था)

0 comments: